Tuesday 21 March 2023

जिल्हास्तरीय युवा उत्सव उत्साहात संपन्न

 


जालना, दि. 21 (जिमाका)— भारत सरकारच्या युवा कार्यक्रम, क्रीडा मंत्रालय संचलित नेहरू युवा केंद्र जालना द्वारा जिल्हास्तरीय युवा उत्सव हा जालन्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत उत्साहात आज संपन्न झाला.

पहिल्या सत्रात दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाक्रिडा अधिकारी अरविंद विद्यागर, प्राचार्य प्रा. डॉ. प्रवीण उखळीकर, जिल्हा समन्वयक रा.से.यो.  प्रा.डॉ.सोमनाथ खाडे, जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, नेहरू युवा केंद्राचे लेखापाल  अजिंक्य गवळी उपस्थित होते.  प्रस्तावित प्रा. डॉ. सोमनाथ खाडे यांनी केले. यावेळी   जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ‘कॅच द रेन’ पोस्टरचे अनावरण करण्यात आले. तसेच केंद्रीय संचार ब्युरो व शाहीर मीरा उमप व पार्टी औरंगाबाद यांच्या सहकार्याने पथनाट्यद्वारे महाराष्ट्र गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातिल जवळपास 500 युवक युवती युवा उत्सवात उवस्थित होते. शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यासाठी परिसरात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते.

 

युवा उत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेल्या 5 पंच प्राणांवर आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यात मुख्यत्वे गुलामी की हर सोच से मुक्ती यावर चित्रकला स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा, भाषण स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम, छायाचित्र स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी युवा उत्सवात होती. 19 ते 29 वयोगटातील नवोदित कलावंतांकडून बहारदार सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धांमध्ये प्रणित सांगवीकर यांच्या हस्ते विजेत्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  परीक्षक म्हणून  राधेश्याम राजपूत, मिलिंद सावंत, महेश भुरेवाल, संतोष जोशी, कांचन वाघ, अश्विनी चाकोते, रमण उपाध्याय, परमेश्वर क्षिरसागर, सचिन चव्हाण, तिरुपती मगर, शाम चव्हाण, महेंद्र साबळे,  बी. जि. श्रीरामे, प्रवीण उखळीकर,सोमनाथ खाडे इत्यादींच्या उपस्थतीत स्पर्धा झाली. आभार प्रदर्शन अजिंक्य गवळी यांनी केले  कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयपाल राठोड, मिलिंद सावंत, वसंत सुर्वे, बाळासाहेब देशमुख, मुकेश सपकाळे, अमोल जैस्वाल, विलास सोनुने, शुभम शुक्ल, अजय पैठणे, प्रीती झिने, श्वेता इंगळे, रवी दळे, रुपाली भापकर आदींनी परिश्रम घेतले. जलशपथ घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment