Monday 13 March 2023

थकीत बिगर सिंचन पाणीपट्टी भरणा करण्याचे आवाहन थकीत पाणीपट्टी असणाऱ्या ग्रामपंचायतीची यादी जाहीर

 


 

       जालना, दि.13 (जिमाका) :-  जालना पाटबंधारे विभाग, जालना  अधिनस्त पाटबंधारे उप विभाग क्र-1 जालना, उपविभाग क्र.2 अंबड, उप-विभाग -3 टेंभुर्णी, उपविभाग क्र.4 वाटुर उपविभाग क्र.2 सेलु या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्प निहाय बिगर सिंचन ग्राहक नगर पालिका, नगर पंचायत, साखर कारखाने,सामाजिक प्रतिष्ठाणे आदीकडे ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत.

सदर योजनेकडे बिगर सिंचन पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे सदर थकबाकी वसुलीसाठी अधिक्षक अभियंता  व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या कार्यालयाकडुन सन 2022-23 साठी 100 टक्के वसुलीचे उद्दिष्ट विभागीय कार्यालयास प्राप्त आहे. त्याप्रमाणे विभागीय कार्यालयाकडुन दि. 30 जानेवारी 2023 ते 21 फेब्रुवारी 2023 रोजी धडक मोहिम राबवून सर्व उप-विभागाकडुन जिल्ह्यात एकाच वेळी प्रकल्पातुन पिण्यासाठी पाणी उपसा करणाऱ्या योजनेचे पाणी पुरवठा सह विद्युत पुरवठा अंशत: खंडीत करण्यात आला होता, त्यामुळे काही प्रमाणात वसुली झाली परंतु प्राधिकरण कार्यालयाकडुन 100 टक्के थकीत पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट असल्याने प्रकल्पातुन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातुन बिगर सिंचन पिण्याच्या पाण्याचा उपसा करणाऱ्या सोबतच्या यादीप्रमाणे बिगर सिंचन योजना धारकांचा पाणी पुरवठा सह विद्युत पुरवठा दि. 16 मार्च 2023 पासुन पुर्णत: खंडीत करण्यात येणार आहे.  

थकीत बिगर सिंचन पाणीपट्टी योजनेचा ग्रामपंचायत निहाय गोषवारा (जालना पाटबंधारे विभाग) खालीलप्रमाणेआहे. 

       कल्याण मध्यम प्रकल्प- ता. जालना येथील सिंदी काळेगाव थकीत रक्कम 2.26 लक्ष, रामनगर थकीत रक्कम 4.98 लक्ष , पिरकल्याण थकीत रक्कम 3.24 लक्ष, मजरेवाडी थकीत रक्कम  0.61 लक्ष ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

     दरेगांव लघु प्रकल्प- ता. जालना येथील  दरेगाव थकीत रक्कम 6.02 लक्ष, सिरसवाडी थकीत रक्कम 5.69 लक्ष, ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

     जामवाडी लघु प्रकल्प- तालुका जालना येथील जामवाडी थकीत रक्कम 0.80 लक्ष, श्रीकृष्णनगर थकीत रक्कम 1.01 लक्ष,  ग्रामपंचायत.

      कल्याण गिरजा मध्यम प्रकल्प- जिल्हा जालना तालुका जालना येथील सावंगी थकीत रक्कम 2.01 लक्ष, पाहेगाव थकीत रक्कम  1.94 लक्ष ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

      नेर लघु प्रकल्प -जिल्हा जालना येथील नेर थकीत रक्कम 11.85 लक्ष ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

     अप्पर दुधना मध्यम प्रकल्प- तालुका बदनापुर येथील  गेवराई बाजार थकीत रक्कम 1.90 लक्ष, सोमठाणा थकीत रक्कम 3.83 लक्ष, निकळंक थकीत रक्कम 3.79 लक्ष, मालेवाडी थकीत रक्कम 1.36 लक्ष, ढवळापुरी थकीत रक्कम 1.62 लक्ष, खडकवाडी  थकीत रक्कम  0.93 लक्ष, दुधनवाडी थकीत रक्कम 0.16 लक्ष, वरुडी थकीत रक्कम 2.08 लक्ष, अकोला थकीत रक्कम 3.30 लक्ष ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

     आन्वी लघु प्रकल्प- तालुका बदनापुर येथील उज्जैनपुरी थकीत रक्कम 3.40 लक्ष, राळा थकीत रक्कम 1.09 लक्ष, भरडखेडा थकीत रक्कम 2.21 लक्ष, अन्वी थकीत रक्कम 1.58 लक्ष, हिवरा थकीत रक्कम 3.52 लक्ष, केळीगव्हाण थकीत रक्कम 1.96 लक्ष ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

     गल्हाटी मध्यम प्रकल्प- तालुका अंबड येथील शहापुर थकीत रक्कम 7 लक्ष, दाढेगाव थकीत रक्कम 3.38 लक्ष, पिठोरी सिरसगाव थकीत रक्कम 7.51 लक्ष, ढाकलगाव थकीत रक्कम 5.90 लक्ष, दोदडगाव थकीत रक्कम 3.27 लक्ष,  बारसवाडा थकीत रक्कम 4.67 लक्ष, सोनक पिंपळगाव 3.79 लक्ष, रेवलगाव थकीत रक्कम 3.08 लक्ष ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

     डावरगांव लघु प्रकल्प - तालुका अंबड येथील पाचोड थकीत रक्कम  6.48 लक्ष, नागोणे वाडी थकीत रक्कम 2.80 लक्ष, पिंपरखेड थकीत रक्कम 0.73 लक्ष,  पागीरवाडी थकीत रक्कम 0.62 लक्ष, जामखेडा थकीत रक्कम 0.39 लक्ष, ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

      मार्डी लघु प्रकल्प- तालुका अंबड येथील नांदी थकीत रक्कम  2.16 लक्ष, मार्डी थकीत रक्कम 1.35 लक्ष, शिरोढोण थकीत रक्कम 1.39 लक्ष, भिवंडी बोडखा थकीत रक्कम 0.45 लक्ष, ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

    भातखेडा लघु प्रकल्प- तालुका अंबड येथील बोरी थकीत रक्कम 0.79 लक्ष ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

    तळेगाव लघु प्रकल्प- तालुका अंबड येथील राणी उंचेगाव थकीत रक्कम 7 लक्ष, मानेपुरी थकीत रक्कम 1.23 लक्ष ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

     रोहीलागड लघु प्रकल्प - तालुका अंबड येथील रोहीलागड थकीत रक्कम 5.15 लक्ष. ग्रामपंचायतीची बिल थकीत आहे.

  पोखरी लघु प्रकल्प - तालुका मंठा येथील वाटुर ग्रामपंचायतीची थकीत रक्कम 6.24 लक्ष बिल थकीत आहे.

   पिंपरखेडा लघु प्रकल्प- तालुका मंठा येथील पिंपरखेडा थकीत रक्कम 2.10 लक्ष ग्रामपंचायतीची बिल थकीत आहे.

      ढोकसाळ लघु प्रकल्प - तालुका मंठा येथील ढोकसाळ थकीत रक्कम 0.11 लक्ष, वाघोडा थकीत रक्कम 1.12 लक्ष ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

       जुई मध्यम प्रकल्प - तालुका भोकरदन येथील वाकडी थकीत रक्कम 2.21 लक्ष, विरेगाव थकीत रक्कम 0.92 लक्ष, तळणी थकीत रक्कम 0.50 लक्ष, सुरंगळी थकीत रक्कम 2.26 लक्ष, सिपोरा बाजार थकीत रक्कम 1.57 लक्ष, मनापुर थकीत रक्कम 1.20 लक्ष, मालेगाव थकीत रक्कम 1.39 लक्ष, कठोरा थकीत रक्कम 3.06 लक्ष, देहेड थकीत रक्कम 2.12 लक्ष, भयाडी थकीत रक्कम  1 लक्ष, दानापुर थकीत रक्कम  2.82 लक्ष, दगडवाडी थकीत रक्कम  2.12 लक्ष, पिंपळगाव रेणुकाई 2.75 लक्ष, पळसखेडा 1.76 लक्ष, मलकापुर थकीत रक्कम  0.05 लक्ष, बाभुळगाव थकीत रक्कम  1.41 लक्ष, करजगाव थकीत रक्कम  0.98 लक्ष, कल्याणी थकीत रक्कम  1.77, वरुड थकीत रक्कम  2.12 लक्ष, ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

    धामना मध्यम प्रकल्प - तालुका भोकरदन येथील अन्वा थकीत रक्कम 4.97 लक्ष, हिसोडा खु. थकीत रक्कम 1.28 लक्ष, जळगाव सपकाळ थकीत रक्कम 3.16 लक्ष, लिहा थकीत रक्कम 1.24 लक्ष, पोखरी थकीत रक्कम 0.63 लक्ष, सेलुद थकीत रक्कम 3.33 लक्ष, वडोदा तांगडा थकीत रक्कम 1.48 लक्ष, वालसावंगी थकीत रक्कम 14.01 लक्ष ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे. 

      पिंपळगांव कोलते लघु प्रकल्प - तालुका भोकरदन येथील  टाकळी कोलते थकीत रक्कम 4.05 लक्ष, लोधेवाडी थकीत रक्कम 0.39 लक्ष, रिधोरा देवी थकीत रक्कम 2.04 लक्ष, धानोरा थकीत रक्कम 1.92 लक्ष या ग्रामपंचायतीची बिल थकीत आहे.

    प्रल्हादपुर लघु प्रकल्प - तालुका भोकरदन येथील वाडी बु. थकीत रक्कम 0.83 लक्ष या  ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

    जीवरेखा मध्यम प्रकल्प - तालुका जाफ्राबाद येथील टेंभुर्णी थकीत रक्कम 17.93 लक्ष, देळेगव्हाण थकीत रक्कम  2.33 लक्ष, पोखरी थकीत रक्कम 2.50 लक्ष, अकोला देव थकीत रक्कम 4.84 लक्ष, पोखरी थकीत रक्कम 2.50 लक्ष, अंबेगाव थकीत रक्कम 1 लक्ष, बुटखेडा थकीत रक्कम 2.80 लक्ष या  ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

    भारज लघु प्रकल्प - तालुका जाफ्राबाद येथील  भारज बु. थकीत रक्कम 3.68 लक्ष, आढा थकीत रक्कम 2.44 लक्ष, पासोडी थकीत रक्कम 0.32 लक्ष, भारज खु. थकीत रक्कम 1.68 लक्ष या ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

  कोनड लघु प्रकल्प - तालुका जाफ्राबाद येथील कोनड खु थकीत रक्कम 1.28 लक्ष, वरुड खु. थकीत रक्कम 7.20 लक्ष, कोनड बु. थकीत रक्कम 3.20 लक्ष, कोळेगांव थकीत रक्कम 1.46 लक्ष, सांजोळ थकीत रक्कम 1.01 लक्ष, येवता थकीत रक्कम 0.58 लक्ष, देऊळगाव  धनगर थकीत रक्कम 3.95 लक्ष या ग्रामपंचायतीची बिल थकीत आहे.

   ढोलखेडा लघु प्रकल्प  - तालुका जाफ्राबाद येथील डोलखेडा मंगरुळ थकीत रक्कम 1.93 लक्ष, अमोना थकीत रक्कम 1.24 लक्ष या ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे.

    चिंचखेडा लघु प्रकल्प - तालुका जाफ्राबाद चिंचखेडा थकीत रक्कम 0.44 लक्ष, येवता थकीत रक्कम 1.73 लक्ष या ग्रामपंचायतींची बिल थकीत आहे,           अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. कोरके यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment