Wednesday 1 March 2023

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार नियमावलीत बदल महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना पुरस्कारासाठी पुस्तके आता सादर करता येणार

 

जालना, दि.1 (जिमाका) :-  स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार प्रवेशिकेसाठी आता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त  सदस्य वगळता इतरांना पुरस्कारासाठी पुस्तके सादर करता येणार आहे.  गतवर्षीच्या स्व. यशवंतराव चव्हाण राजय वाड्.मय पुरस्कार स्पर्धेच्या नियमावलीतील नियम क्र. 24 मध्ये सदर बदल करण्यात आला आहे, अशी माहिती तहसीलदार (सर्वसाधारण) संतोष गोरड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीसाठी वर्ष 2022 करीता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार स्पर्धेसाठीच्या प्रवेशिका दि. 29 डिसेंबर 2022 रोजी दैनिक वृत्तपत्रात प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळुन), महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली व पणजी,गोवा येथे तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 जानेवारी 2023 ते 31 जानेवारी 2023 पर्यंत पाठविता येणार होत्या. तथापि, सदर पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दि. 2 मार्च 2023 हा राहील. शासन निर्णयान्वये शासनस्तरावरुन  गतवर्षीच्या स्व. यशवंतराव चव्हाण राजय वाड्.मय पुरस्कार स्पर्धेच्या नियमावतीलतील नियम क्र. 24 मध्ये बदल करण्यात आला असून सदर नियमात, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावरील शासन नियुक्त सदस्य वगळता इतरांना या पुरस्कारसाठी पुस्तके सादर करता येतील. अशी सुधारणा करण्यात आली आहे. या योजनेची सन 2022 च्या पुरस्कार स्पर्धेसाठीची सुधारीत नियमावली व प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली व पणजी, गोवा येथे महाराष्ट्र  शासनाच्या  www.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर व महाराष्ट्र  राज्य साहित्य आणि संस्कृती आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in  या संकेतस्थळावर व कार्यालयात उपलब्ध आहे. असे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment