Thursday 23 March 2023

31 मार्च रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ महाराष्ट्र शासनाच्या व्यवहारासाठी रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार

 


       जालना, दि. 23 (जिमाका):- जिल्ह्यातील शासकीय आदान प्रदानाचा व्यवहार करणारी स्टेट बँक ऑफ इंडियाची जालना शहरातील शिवाजी चौकातील शाखा ही दि. 31 मार्च 2023 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत व तालुका स्तरावरील शासनानचे व्यवहार सांभाळणाऱ्या अंबड, परतुर, भोकरदन, मंठा, बदनापुर, जाफ्राबाद  येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा तसेच घनसावंगी येथील बँक ऑफ महाराष्ट्र  शाखेचे रात्री 12 वाजेपर्यंत कामकाज सुरु ठेवण्यात यावेत, असे आदेश जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी जारी केले आहेत.

शासनाकडुन व प्रत्येक नियंत्रक अधिकाऱ्याकडुन विविध लेखाशीर्षा अंतर्गत प्राप्त झालेली अनुदाने व सुधारीत मागणीनुसार दि. 31 मार्च 2023 अखेर प्राप्त प्रदाने व्हावे व ती व्यपगत होऊ नयेत. तसेच शासकीय रक्कमांचा जास्तीत जास्त भरणा करणे सुलभ व्हावे व दृष्टीने महाराष्ट्र कोषागार नियम 1968 चे नियम क्रमांक 409 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी विजय राठोड  यांनी आदेश जारी केले आहेत.  तरी  जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी तसेच शासकीय व्यवहार सांभाळणाऱ्या बँकाचे सर्व व्यवस्थापक, जालना येथील शिवाजी चौकातील स्टेट बँक ऑफ इंडिया, व तालुका स्तरावरील कोषागाराचे आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या अंबड, परतुर, भोकरदन, मंठा, बदनापुर, जाफ्राबाद येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा तसेच घनसावंगी येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या शाखा यांनी आदेशाचे पालन करावे आणि प्राप्त अनुदान व्‍यपगत होणार नाही व शासकीय वसुलीच्या जास्तीत जास्त भरणा शासनखाली होईल यांची कटाक्षाने दक्षता घ्यावी. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment