Wednesday 8 March 2023

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम जाहीर; सर्व स्पर्धांसाठी ऑनलाईन प्रवेशिका भरावी

 

 

जालना, दि. 8 (जिमाका) :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा क्रीडा परिषदेच्यावतीने तसेच एकविध जिल्हा क्रीडा संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या विनाअनुदानित खेळाच्या  जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  तरी खेळाच्या स्पर्धा त्या-त्या संघटनामार्फत आयोजित व नियोजित करण्यात येणार असून संबंधित खेळ प्रमुखांशी संपर्क साधावा तसेच क्रीडा कार्यालयाकडून खेळासाठी jalnadso.com हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले असून सर्व स्पर्धांसाठी ऑनलाईन प्रवेशिका भरावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

खेळामध्ये  कुडो दि.9 मार्च 2023 रोजी जालना येथील लिटल फ्लावर स्कुल, हाफ कुडो बॉक्सिंगसाठी  दि.9 मार्च रोजी,  टेनिस बॉल क्रिकेट व फुटबॉल टेनिस आणि म्युझिकल चेअर दि.11 मार्च रोजी  जिल्हा क्रीडा संकुलात, युनिफाईट दि.11 मार्च रोजी तर सिलंबम दि.13 मार्चला कामगार कल्याण केंद्रात, थायबॉक्सिंग दि.14 मार्चला जिल्हा क्रीडा संकुलात, स्पोर्ट डान्स दि.14 मार्चला कामगार कल्याण केंद्रात, जीत कुने डो दि.15 मार्च कामगार कल्याण केंद्रात, थांगता मार्शल आर्ट दि.16 मार्चला कामगार कल्याण केंद्रात, रस्सीखेच दि.18 मार्च रोजी जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, चॉयक्वांदो दि.18 मार्चला कामगार कल्याण केंद्रात, टेनिस क्रिकेट दि.19 मार्चला तर मॉन्टेक्स बॉल क्रिकेट खेळाचे जिल्हा क्रीडा संकुलात याप्रमाणे स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अधिक माहितीसाठी  संतोष वाबळे (मो.7588169493), रेखा परदेशी (मो.9022951924), महमंद शेख (8788360313) या खेळ प्रमुखांशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment