Monday 6 March 2023

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत

 

जालना, दि. 6 (जिमाका) :- महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक आधात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्ती व संस्थेसाठी प्रत्येक  एक पुरस्कार देण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी अर्ज सादर करावेत. असे आवाहन  समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता- शिवा पुरस्कार नियमावली बाबतचा शासन निर्णय दि. 8 मार्च 2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये वीरशैव-लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक आधात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तीच्या व संस्थांच्या कामाची दाद / दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरुन या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक, प्रबोधनकार व साहित्यीक सरसावून पुढे यावेत याकरिता व्यक्तीसाठी एक व सामाजिक संस्थांसाठी एक असे एकूण दोन पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुरस्काराकरिता जिल्ह्यातील इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण जालना यांच्याकडे रितसर अर्ज करण्यात यावा. या पुरस्कारासाठी पात्रताबाबतची नियमावली दिनांक 8 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णय निर्गमित झाला आहे. तरी इच्छुक व्यक्ती व संस्था यांनी सदरहुन पुरस्कारासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय जालना यांचेकडे दि.16 मार्च 2023 पर्यंत अर्ज करावेत. अर्जाचा विहीत नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना कार्यालयात उपलब्ध आहे. अर्जासोबत आवश्यक व योग्य ती माहिती जोडावी. असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-


No comments:

Post a Comment