Thursday 23 March 2023

राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात शहीदांना अभिवादन

 



 

जालना, दि. 23 (जिमाका) :- नेहरु युवा केंद्र, युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था  व राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. 23 मार्च 2023 रोजी शहीद दिवस राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थित प्रा. डॉ. सुनंदा तिडके व  प्रा. डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांच्या हस्ते शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच शहीद दिनाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.  यावेळी राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वय प्रा. डॉ. सोमनाथ खाडे,  डॉ. प्रताप रामपुरे, प्रा. डॉ. वाघ, प्रा. लहुराव दर्गुडे, प्रा. सचिन जैस्वाल, सुरेश घुले, जयपाल राठोड यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment