Wednesday 1 March 2023

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर 2 मार्चला जालना जिल्हा दौऱ्यावर

 


                                                           

जालना, दि. 1 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर गुरुवार, दि.2 मार्च 2023 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार दि. 2 मार्च 2023 रोजी सकाळी 11 ते 1.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी व आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.30 वा. पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत विविध संस्थांना भेटी- शाळा, महाविद्यालये,भरोसा सेल, वन स्टॉप सेंटर, मुलींचे वसतिगृह, दामिनी पथक आदी ठिकाणी उपस्थिती. सायंकाळी 6 वाजता जालना येथून परभणी येथील शासकीय विश्रामगृहाकडे त्या प्रयाण करतील.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment