Wednesday 9 August 2023

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली पंचप्रण शपथ ‘मेरी माटी मेरा देश’ व ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

 




 

जालना, दि. 9 (जिमाका) - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप सोहळ्यानिमित्त आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना पंचप्रण शपथ दिली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, मनिषा दांडगे, सरिता सुत्रावे, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौदर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर आदींसह इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येन उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पांचाळ म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या सांगता सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) उपक्रम राबविण्यात येणार असून त्याचा एक भाग म्हणून आज पंचप्रण शपथ घेण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत गावांमध्ये शिलाफलक, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन, ध्वजारोहण आदी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, या सर्व कार्यक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लावून या अभियानात सहभागी व्हावे.

प्रारंभी शपथप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी हातामध्ये थोडीशी माती घेऊन आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू", अशी शपथ घेतली.

***

No comments:

Post a Comment