Tuesday 1 August 2023

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न




जालना दि. 1 (जिमाका) :- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या कार्यालयात आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती  व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन तसेच अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिष्यवृत्ती धनादेश वितरणाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्राध्यापक बसवराज कोरे व प्रमुख पाहुणे म्हणून अतिश ससाने, कार्यालय अधीक्षक तसेच अनिल सुगंध, समाज कल्याण, जालना, दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार बाबासाहेब डोंगरे आदी उपस्थित होते. श्री. कोरे, श्री. व श्री. डोंगरे यांनी आण्णाभाऊंचे कार्य व त्यांच्या जीवन चरित्राबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरण करण्यात आले. यामध्ये कुमारी वैष्णवी विलास थोरात व कुमारी प्रीती अंकुश पाटोळे यांचा समावेश आहे. सूत्रसंचालन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस.  सोनवणे यांनी केले. श्री. आर. आर. आव्हाड यांनी आभार मानले. कार्यक्रमास महात्मा फुले विकास महामंडळाचे श्री. शिंदे,  ओबीसी महामंडळाचे श्री. जाधव , लीडको महामंडळाचे  सुनील गोविंद, सचिन गोपने उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment