जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून
जागतिक आदिवासी दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
जालना, दि. 8 (जिमाका) :- जागतिक
आदिवासी दिनानिमित्त जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ जालना यांचे
संयुक्त विद्यमाने मानेपुरी तांडा येथील जिल्हा परिषद प्रशाला येथे तालुका दि. 8
ऑगस्ट 2023 रोजी कार्यक्रम घेण्यात आला. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या
सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ, प्रमुख
पाहुणे म्हणुन सरपंच श्रीमती राठोड, अॅड.जी.एन.मोरे, सहायक विधीज्ञ अॅड.
ज्ञानेश्वर शेंडगे, व अॅड. ए.एस.लकडे आदि उपस्थित होते. तसेच ग्रामसेवक मानेपुरी
तांडा व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व गावातील तरूण, जेष्ठ व
प्रतिष्ठित नागरिक व महिला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे
प्रास्ताविक अॅड. जी. एन. मोरे यांनी केले. नंतर अध्यक्षीय मार्गदर्शन सचिव प्रणिता
भारसाकडे-वाघ यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य आणि विविध योजना तसेच
जागतिक आदिवासी दिनाचे महत्व तसेच योजना याबद्दल मार्गदर्शन केले. गरजु तसेच
सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल लोकांना मोफत विधीज्ञ उपलब्ध करून देण्यासाठी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कटीबध्द आहे असे सांगितले. सहायक लोक अभिरक्षक अॅड.
ज्ञानेश्वर ए. शेंडगे यांनी उपस्थित गावक-यांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध
योजनांची माहिती व महत्त्व याबद्दल विस्तृतपणे सांगितले. कार्यक्रमानंतर न्यायाधीश
श्रीमती प्रणिता पी. भारसाकडे-वाघ, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना माच्या
हाल- यांनी शाळेच्या आवारात वृक्षारोपन करण्यात आले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे
कळविण्यात आले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment