Tuesday 8 August 2023

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; आज मेरी माटी, मेरा देश अभियानांतर्गत पंचप्रण शपथ

 

 

जालना, दि. 8 (जिमाका) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त संपुर्ण देशभर ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत बुधवार दि.9 ऑगस्ट 2023 रोजी  पंचप्रण शपथ घेतली जाणार आहे. सर्व विभागप्रमुखांनी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आपल्या कार्यालयामध्ये पंचप्रण शपथ घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान राबविण्यात येत असून या उपक्रमानुसार गाव ते शहरांपर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, हा या अभियानाचा उद्देश आहे.

पंचप्रण शपथेचा नमुना पुढीलप्रमाणे आहे. आम्ही शपथ घेतो की, भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करु. गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करु. देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु.  भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्याचे पालन करु.

 

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment