Wednesday 2 August 2023

संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनेसाठी कर्ज प्रस्ताव सादर करावेत

 


जालना, दि. 2 (जिमाका) :-  संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय जालना करीता सन 2023-24 या अर्थिक वर्षासाठी एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या योजनांचे भौतिक उदिष्ट प्राप्त झाले असुन मुदतीत कर्ज योजना लघु व्यवसाय -2, महिला समृध्दी योजना- 11, लघु ऋण वित्त योजना 11, महिला अधिकारीता योजना 2 असे एकुण 26 उदिष्ट प्राप्त झाले आहे. तरी जिल्ह्यातील चर्मकार समाजातील  चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील बेरोजगार युवक युवतीना तसेच होतकरू अर्जदारांनी विविध व्यवसायासाठीचे कर्ज प्रस्ताव दि. 21 ऑगस्ट 2023 पर्यंत जिल्हा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक अरूण राऊत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. 

सर्व योजना एन.एस.एफ.डी.सी. नवी दिल्ली यांच्या मार्फत राबविल्या जातात चर्मकार समाजातील  चांभार, ढोर, मोची, होलार या समाजातील अर्जदाराकडुन विविध व्यवसायासाठी कर्ज प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या समाजातील लाभ घेउ इच्छिणाऱ्या अर्जदारानी या पुर्वी महामंडळाचा कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करून तीन प्रतीत खालील ठिकाणी स्वतःअर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहुन दाखल करावेत त्रयस्थ / मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्विकारले जाणार नाहीत.

कर्जप्रस्तावासोबत 1) जातीचा दाखला(सक्षम अधिकारी कडुन घेतलेला असावा) (2) अर्जदाराच्या कुंटुबाचा उत्पन्नाचा दाखला चालु वर्षाचा (तहसिलदार यांच्या कडुन घेतलेला असावा) (3) नुकताच काढलेल्या पासपोर्ट फोटो 3 जोडाव्या ( 4 ) अर्जदाराचा शैक्षणीक दाखला (5) राशनकार्ड दोन्हा बाजुने झेरॉक्स प्रत (6) आधार कार्ड / मतदान कार्ड / पॅन कार्ड झेरॉक्स प्रत ( 7 ) व्यपसायाचे दरपत्रक जिएसटी चे (8) व्यवसाया ज्या ठिकाणी करावयाचा आहे त्या जागेची भाडेपावती/ करारपत्रक किंवा मालकी हक्काचा पुरावा नमुना नं. 8 लाईट बिल, टॅक्स पावती (9)मुदती कर्ज योजनेसाठी प्रकल्प अहवाल ( 10 ) व्यवसायाचे ग्रा.पं./ न.प./ यांचे नाहरकत प्रमाणपत्र (12)व्यवसाया संबंधी तांत्रीक प्रमाणपत्र तसेच अनुभव दाखला (13) लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र ( 14 ) लाभार्थ्याचा सिबिल केडीट स्कोर 500 च्या वर असावा रिपोर्ट (15) अनुदान व लाभ न घेतल्या बाबत प्रतिज्ञापत्र वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे स्वयसाक्षाकीत करून घोषणा पत्र आदि कागदपत्रे जोडावी.

 महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज दि. 21 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 9:30 ते संध्याकाळी 6:15 पर्यंत जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालया समोर, जालना या ठिकाणी अर्ज वाटप व परीपुर्ण भरलेले अर्ज स्विकारले जातील. जालना जिल्हयातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील बेरोजगार युवक युवतीना तसेच होतकरू अर्जदारांनी जास्तीत जास्त योजनेचा लाभ घ्यावा. असेही   प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment