Monday 14 August 2023

कायदेविषयक जनजागृती शिबीर जालना येथील जेईएस महाविद्यालयात संपन्न

 


जालना, दि. 14 (जिमाका) :-  जागतिक युवा दिनानिमित्त दि. 11 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जे.ई.एस. महाविद्यालय, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले.

 या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण न्यायाधीश तथा सचिव प्रणिता  भारसाकडे वाघ, सहायक निरीक्षक राधा सोळुंखे, प्राचार्य गणेश अग्निहोत्री, अँड. डी. एस. भांदरगे, अॅड. राहुल चव्हाण हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस विशेष नवमतदार नाव नोंदणी शिबीर या मोहिमेचे न्यायाधीश तथा सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ यांनी उद्घाटन करून नवमतदार नोंदणीस महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी सुरूवात केली. सचिव प्रणिता भारसाकडे वाघ यांनी महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी यांना आपला न्यायाधीश या पदापर्यंतचा प्रवास आणि आपण जीवनात कसे पुढे गेले पाहिजे याबाबत सांगितले, तसेच यशस्वी व्हायचे असल्यास शिक्षणासोबत अध्यात्माची देखील जोड पाहिजे तसेच स्पर्धा परिक्षाचा अभ्यास कसा करावा, विद्यार्थांनी कधीही आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आला तरीही त्याला तोंड देवून आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी सतत प्रयत्न केले पाहिजे म्हणजे आपले जीवन यशस्वी होईल असे सांगितले.

रस्ता सुरक्षा विषयी नियम याबद्दल श्रीमती सोळुंखे यांनी उपस्थितांना माहिती दिली. अँड. डी. एस. भांदरगे यांनी रॅगिंग विरोधी कायद्याबद्दल माहिती दिली. अॅड. राहुल ए. चव्हाण यांनी जागतिक युवा दिनानिमित्त विद्यार्थाना मार्गदर्शन केले.  महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश अग्निहोत्री यांनी अध्यक्षीय भाषण करून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment