Tuesday 8 August 2023

 

शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी क्रीडा

संघटनाच्या पदाधिकारी, संयोजकांची बैठक संपन्न

 

जालना, दि. 8 (जिमाका) :-  90 खेळाच्या जिल्हास्तर, विभागस्तर, राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन त्या त्या खेळाच्या अधिकृत जिल्हा संघटनाची तांत्रिक आणि आर्थिक मदत घेऊन पुर्ण करण्यासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर शालेय क्रीडा स्पर्धा 2023-24 चे आयोजन व नियोजन करण्यासाठी दि. 4 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनाच्या अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी यांची जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

महाराष्ट्र शासनाच्या, क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जालना व जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सन 2023-24 या वर्षाकरिता एकुण 90 खेळाच्या शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, यांनी तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजनाबाबत मार्गदर्शन करून सर्व स्पर्धा दर्जेदारपणे आयोजित करण्यात यावेत बाबत सूचित केले. यावेळी जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनेचे पी.जे. चाँद, प्रशांत नवगिरे,  प्रमोद खरात,  रमेश शिंदे,  राजेभाऊ थोरात,  दत्ता पवार,  सचिन आर्या,  विजय गाडेकर,  अंबादास गिते इत्यादीसह विविध क्रीडा संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी 12 वाजता जिल्ह्यातील तालुका क्रीडा स्पर्धा संयोजकांची बैठक संपन्न  झाली. बैठकीत आगामी तालुकास्तर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजनावर चर्चा करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धाचे आयोजन दि. 21 ऑगस्ट 2023 पासून सुरूवात करण्यात येणार आहे. सदर शालेय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना मार्फत तयार करण्यात आलेल्या www.jalnadso.com या वेबसाईडचा वापर करण्यात येणार आहे. सदर बैठकीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयालयातील महमंद शेख, संतोष वाबळे, श्रीमती रेखा परदेशी, संतोष प्रसाद, सोपान शिंदे, हारूण खान, राहुल गायके इत्यादीने परिश्रम घेतले. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment