Tuesday 8 August 2023

 

पालकमंत्री अतुल सावे  यांनी जिल्हा क्रीडा

संकुलास भेट देवून केली कामांची पाहणी

 

जालना, दि. 8 (जिमाका) :-   जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना मार्फत जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे विविध विकास कामे सुरू असून सदर कामास दि.7 ऑगस्ट 2023 रोजी गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथील सुरू असलेल्या क्रीडा सुविधांच्या विकास कामास भेट देऊन पाहणी केली.

 पालकमंत्री श्री.सावे यांनी विकसीत करावयाचे कामे गुणवत्तापूर्वक करून कामाची गती वाढवावी अशी सुचना केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, नियुक्त खाजगी वास्तुविशारद शि प्रभु अॅण्ड असोसिएटस, पुणे यांचे प्रतिनिधी धिरज शर्मा यांनी सुरू असलेल्या विकास कामाची माहिती दिली.

 

यावेळी  आमदार नारायण कुचे,  आमदार संतोष दानवे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक तुषार दोशी,  जिल्हा नियोजन अधिकारी सुशिल सुर्यवंशी, उपसभापती भास्कर दानवे, सा.बा. विभाग कार्यकारी अभियंता श्री.कांडलीकर, पोलीस निरीक्षक श्री. माने, जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीचे प्रमोद खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे संतोष वाबळे, संतोष प्रसाद, सोपान शिंदे, हारूण खान, राहुल गायके आदी उपस्थित होते. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment