Monday 14 August 2023

जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिनाचे 21 ऑगस्ट रोजी आयोजन

 


 

जालना, दि. 14 (जिमाका) :-  महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्याचे ठरवले आहे. त्यानुसार तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात यावे असे नमुद करण्यात आले आहे. माहे ऑगस्टमध्ये तिसऱ्या सोमवारी म्हणजे दि. 21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करू इच्छिणाऱ्या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज स्विकृतीचे निकष खालील प्रमाणे आहेत. तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावेत. तक्रार / निवेदन दोन प्रतित सादर करावेत. सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावेत. अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा. सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत. निवडणूक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तरावर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही. शासन निर्णया प्रमाणे महिलांना प्रथम संबंधीत तहसिलदार यांचेकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतित तक्रार दाखल करावी. तालुका महिला लोकशाही दिनात एक महिन्याचे आत कार्यवाही न झाल्यास अर्जदार महिला जिल्हास्तरी महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करू शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनात अर्जदार महिलेस अंतिम उत्तर शक्य ‍लवकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत उत्तर देण्याचे बंधन संबंधीत अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. तरी महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क करून या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे अवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी करीत आहेत. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment