Tuesday 15 August 2023

पारशी टेकडीवर पणन, अल्पसंख्यांक विकास, औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


 

       जालना, दि.15 (जिमाका):- जालना शहरालगत असलेल्या पारशी टेकडीवर रोटरी मिडटाऊन क्लबच्या वतीने 30 फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात येऊन सुशोभिकरण करण्यात आले आहे. याला "अमर जवान पॉईंट" असे नाव दिले आहे. या ठिकाणी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त  राज्याचे पणन, अल्पसंख्यांक विकास, औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

        पारसी टेकडीवरील आयोजित ध्वजारोहण व तिरंगा ध्वज रॅली कार्यक्रमास माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, रोटरी क्लबचे प्रतीक नानावटी, सुनील रायठट्टा, उदय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          जालना शहराजवळील औद्योगिक वसाहत परिसर व समृद्धी महामार्गाजवळ असलेल्या पारसी टेकडीवर कुंडलिका-सीना नदी फाउंडेशन, समस्त महाजन ट्रस्ट, जालना रोटरी क्लब मिडटाऊन यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात येऊन तिरंगा ध्वज रॅली टेकडीच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत काढण्यात आली. पारशी टेकडीचे सुशोभीकरण करून ही हरित टेकडी बनविण्यासाठी या ठिकाणी वृक्षारोपणासह नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.  कार्यक्रमप्रसंगी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व पर्यावरणप्रेमी नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                                          -*-*-*-*-

No comments:

Post a Comment