Thursday 10 August 2023

बालगृहांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरीय तपासणी समितीमध्ये अशासकीय सदस्य पदासाठी अर्ज करावेत

 


जालना, दि. 10 (जिमाका) :-मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम-2015 च्या कलम 54 नुसार बालगृहांच्या तपासणीसाठी जिल्हास्तरावर तपासणी समिती गठित करण्यात येणार  आहे. तरी इच्छुकांनी नामांकन प्रस्तावासह अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना या कार्यालयातून घेऊन आवश्यक कागदपत्रासह आपला अर्ज दि. 22ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रशासकीय इमारत, तळ मजला, जालना या कार्यालयात सादर करावेत. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी केले आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) 2015 व महाराष्ट्र राज्य बाल (मुलांची काळजी व सरंक्षण) नियम 2018 नुसार जिल्हास्तरीय तपासणी समितीमधील अशासकीय सदस्याची तीन वर्षे कालावधी करीता नियुक्ती करावयाची असून इच्छुकांनी प्रस्ताव दि.22 ऑगस्ट 2023 पर्यंत सादर करावेत.  अशासकीय सदस्याची  खालील अटी व शर्तीनुसार नामांकने मागविण्यात येत आहेत. अशासकीय सदस्य म्हणुन अर्जदार उमेदवार किमान पदवीधर असावा. तसेच उमेदवाराला बाल हक्क, काळजी व संरक्षण आणि कल्याण क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील. उमेदवाराचे वय 35 पेक्षा कमी व 65 पेक्षा जास्त नसावे. अशासकीय सदस्याचा कालावधी नेमणुकीपासून तीन वर्षांचा राहील. जिल्हयात प्रवास करण्याची तयारी असावी. जिल्ह्यात प्रवास करताना शासन नियमाप्रमाणे प्रवासभत्ता अनुज्ञेय राहील याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत. अर्जदार बालकांची काळजी घेणाऱ्या कोणत्याही निवासी संस्थेशी संबंधीत नसावा. मुदतीनंतर प्रस्ताव स्वीकारण्यात येणार नाहीत,  असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वार कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment