Wednesday 9 August 2023

जालना येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील 130 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

 

 जालना, दि. 9 (जिमाका) :- शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे संचालित, शासकीय तंत्रनिकेतन जालना येथील 130 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड करण्यात आली आहे. सर्व निवड झाल्याने विद्यार्थी व पालकांनी आनंद व्यक्त केला.

तंत्रनिकेतनाचे प्र. प्राचार्य डॉ. एन. आर. जावडे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनानुसार प्रा. जी. जी. गोरे, प्र. प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी, रोजगार संदर्भात विविध संधी उपलब्ध करुन देण्याकरिता ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवितात, संस्थेतील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, कंप्युटर, केमिकल या शाखेतील विद्यार्थ्यांच्या नामांकित कंपन्यान मार्फत मुलाखती घेण्यात आल्या. याचेच फलित म्हणून यावर्षी अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या 130 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड झालेली आहे. यामध्ये बजाज ऑटो -५८, एल अँड टी कन्स्ट्रक्शन -०४, सिमेन्स- १२ जीई स्टॅम्प पुणे -११, फिलिप्स हेल्थ केअर पुणे -०३, जीई ईव्हीएशन पुणे - ०४, फोर्ब्स & कंपनी पुणे ०६, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद- ०६. कालिका स्टील जालना -०५ आदि कंपन्यांचा समावेश आहे. असे प्र.प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment