Thursday 3 August 2023

महसूल सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

 


 

जालना, दि. 2 (जिमाका) :-  जिल्ह्यात महसूल सप्ताहाचे 1 ते  7 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीरात महसूल विभागातील एकुण 58 अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.   

जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे अधिकारी व  कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी शिबिरात हिपॅटायटीस बी व सी तपासणी प्रसंगी जिल्हा हिपॅटायसिस नियंत्रण कार्यक्रम प्रमुख डॉ. प्रशांत बादल,  औषध निर्माण  अधिकारी मनिष जाधव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संदीप लुखे, डॉ.नंदकुमार जाधव व इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. या शिबीरात एकूण 85 अधिकारी-कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली असून निदान झालेल्या रुग्णांना गरजेनूसार पुढील उपचार जालना जिल्हा रुग्णालयामार्फत मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment