Wednesday 2 August 2023

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत कार्यशाळांचे आयोजन

 


जालना, दि. 2 (जिमाका) :-  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही महाराष्ट्र शासनाची फ्लॅगशीप कार्यक्रम अंतर्गत महत्त्वाची योजना असून जिल्ह्यामध्ये या कार्यालयामार्फत सन 2023-24 करिता सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्ह्यास 890 कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार युवक युवतींना या योजनेच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्यासाठी या कार्यालयामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये सुशिक्षीत बेरोजगारांना स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन करण्याकरीता 8 तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेमध्ये आपल्या तालुक्यांतर्गत एक गाव एक उद्योजक निर्माण व्हावा याकरीता सदर कार्यशाळेमध्ये मुख्यमंत्री रोजगार योजने अंतर्गत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवश्यक अज व कागदपत्रे तसेच स्वरुप इ.बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याकरीता आपल्या अधिनस्थ ग्रामसेवक यांना त्यांचे संबंधीत गावातील सुशिक्षीत बेरोजगारांना याबाबत माहिती देऊन उपस्थित राहण्याबाबत सूचित करण्यात येणार आहे.

या कार्यशाळा 7 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अंबड  येथील पंचायत समिती सभागृहात, घनसावंगी येथे दुपारी 3 वाजता, 8ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन येथील नगर परिषद सभागृहात, 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंठा येथील पंचायत समिती सभागृहात, 9 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता परतूर येथील पंचायत समिती सभागृहात, 10 ऑगस्‍ट रोजी सकाळी 11 वाजता बदनापूर येथील पंचायत समिती सभागृहात आणि जालना तालुक्यातील पंचायत समिती सभागृहात  तर दि.8 ऑगस्ट रोजी  सकाळी 11 वाजता जाफ्राबाद येथील सिध्दार्थ महाविद्यालयात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment