Friday 18 August 2023

हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

 







 

       जालना, दि.18 (जिमाका):- मराठवाडा मुक्ती संग्रामात हुतात्मे झालेले हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर यांच्या बलिदान दिनानिमित्त आज दि. 17 ऑगस्ट 2023 रोजी हुतात्मा स्मारक, टाऊन हॉल येथे स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले व मामा चौक जालना येथे जनार्दन मामा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी श्याम देशमुख, विनया वडजे, साहित्यिक रावसाहेब ढवळे, मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर, निखिल कुंटे, राजेंद्र कायदे, कल्याण गव्हाणे,  क्रीडा प्रशिक्षक संतोष मोरे, गृहपाल विजय खेडेकर, तसेच जिल्हा परिषद प्रशाला मुलांची जालनाचे विद्यार्थी उपस्थित होते.

हुतात्मा जनार्दन मामा नागापुरकर यांचे स्मृतिप्रित्यर्थ जिल्हा  परिषदेच्यावतीने विविध उपक्रमा अंतर्गत वादविवाद स्पर्धा या शाळा, केंद्र व तालुकास्तरावर 20 सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार असून तालुका स्तरीय विजेत्या स्पर्धकांच्या जिल्हास्तरावर सप्टेंबर महिन्याचा शेवटच्या आठवडयात जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहे. सदर वादविवाद स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. इयत्ता सहावी ते आठवीसाठी - पाण्याचे स्त्रोत संवर्धन जबाबदारी -समाज की प्रशासनाची ? तर  इयत्ता नववी ते दहावीसाठी  " विश्वगरु" बनण्यासाठी भारत सक्षम आहे/ नाही. असे विषय  असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment