Wednesday 9 August 2023

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त 12 ऑगस्ट रोजी मॅरेथॉन स्पर्धा

 

जालना, दि. 9 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक ( डापकु ) सामान्य रुग्णालय जालना कडून जिल्हास्तरावर युथ फेस्टिव्हल अंतर्गत वय वर्ष 18 ते 25 वयोगटातील मुलांसाठी 12 ऑगस्ट 2023 रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. तरी  विविध महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थ्यांनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा.  असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय युवा दिन म्हणून दि. 12 ऑगस्ट 2023 हा साजरा केला जातो युवा वर्ग हा एचआयव्ही/एडस संदर्भात अधिक संवेदनशिल असून या निमित्ताने जालना जिल्ह्यात युवा पिढीमध्ये एडस विरोधी अभियान राबवण्याचा मानस आहे. स्पर्धेला जिल्हा रुग्णालय जालना येथून दि.12 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7 वाजता सुरुवात होऊन जिल्हाधिकारी कार्यालय - अंबड चौफुली मार्गे जय लक्ष्मी भारत पेट्रोलियम जालना येथे समारोप करण्यात येतील. मॅरेथॉन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रथम विजेता पुरुष २५००/- व महिला २५००/-  तसेच तृतीय पंथीय २५००/- देण्यात येईल. द्वितीय विजेता पुरुष १७५०/- व महिला १७५०/- तसेच तृतीय पंथीय १७५०/- देण्यात येईल तृतीय विजेता पुरुष १०००/- व महिला १०००/- तसेच तृतीय पंथीय १०००/- रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकांनी बॅक विवरण सादर केल्यावर खात्यावर पारितोषिक अदा करण्यात येईल. स्पर्धेसाठी जिल्हा कार्यक्रम अधिकारी (डापकू,सामान्य रुग्णालय जालना ) राजेश गायकवाड (मो.9422192152) यांना संपर्क साधावा, असे आवाहन  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.  

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment