Wednesday 2 August 2023

अंमली पदार्थ विरोधात तातडीने कारवाई करावी - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 


 

जालना, दि. 2 (जिमाका) :-  अनेक युवक वेगवेगळ्या अंमली पदार्थांच्या नशेच्या आहारी जातात. हे आपल्या समोरील आव्हान आहे. अंमली पदार्थाचे दुष्पपरिणाम खुप असून त्याच्या सेवनाने युवकांच्या आरोग्यासह मानसिकतेवर विपरीत परिणाम होत असतो. तरी अंमली पदार्थांच्या सेवनातून होणारी गुन्ह्याची वाढ थांबविण्यासाठी अंमली पदार्थ विरोधात तातडीने कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले.

            जिल्हास्तरावर अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच क्षेत्रीय स्तरावरील अंमली पदार्थाबाबतची समस्या प्रभावीपणे हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी श्री.पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलिस अधिक्षक तुषार दोशी यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी श्री.पांचाळ म्हणाले की, जिल्ह्यात गांजा लागवडीबाबतच्या प्रकरणाची माहिती पोलिस विभागाला मिळताच तात्काळ कार्यवाही करावी. तसेच परजिल्ह्यातून ट्रॅव्हल्स, रेल्वेसह खाजगी कुरियरने अंमली पदार्थांची होणारी आवक रोखण्यासाठी यावर विशेष लक्ष ठेवावे. अंमली पदार्थांच्या सेवनातून तरुणांचा आपल्या मेंदूवरचा तोल जावून अशा तरुणांच्या हातून गुन्हा घडण्याची शक्यता असते. जालना जिल्ह्याच्या बाजुने मोठी शहरे आहेत त्यामुळे अंमली पदार्थांची उपलब्धता वेगवेगळ्या मार्गाने होवू शकते. त्यामुळे सापळा रचून, प्रत्यक्ष धाड टाकून कारवाई वेळोवेळी पार पाडावी. संबंधित विभागाला कशाचीही आवश्यकता असेल तर कळवा त्याची पुर्तता केली जाईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment