Thursday 10 August 2023

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 


 

जालना, दि. 10 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, दि. 20 जानेवारी, 2024 साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरले जात असुन जालना जिल्ह्यातील इयत्ता पाचवी वर्गात सन 2023-24 मध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांनी त्यांचे पालकांसह सेवाकेंद्रावरून व ईतर यंत्रणेचा वापर करून ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 10 ऑगस्ट 2023 अशी होती तरी आता प्रशासकीय कारणास्तव दि.17 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

इच्छुक विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांनी हयाची नोंद घेवून ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी पाचवीचे मुख्याध्यापकांकडुन प्रमाणपत्र पत्र भरून घ्यावेत व त्यावर विद्यार्थ्याचा फोटो, स्वाक्षरी व पालकांची स्वाक्षरी करून सदर प्रमाणपत्र हे मुख्याध्यापाकाद्वारे सत्यापित / प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुधारीत प्रमाणपत्र हे खालील दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. फॉर्म भरण्यासाठीचे प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्ष-या हे १० ते १०० KB मध्ये स्कॅन करून संकेतस्थळ "www.navodaya.gov.in" यावरून भरावेत. विद्यार्थ्याचा जन्म हा दिनांक 01/05/2012 पुर्वी व 31/07/2014 नंतर झालेला नसावा. तरी जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज भरावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य  शैलेश नागदेवते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment