Friday 16 June 2023

राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

जालना, दि. 16 (जिमाका) :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश सुर्यकांत ढवळे हे तीन दिवसीय जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. कार्यक्रमानूसार सोमवार दि.19 जुन 2023 रोजी सकाळी 7.30 वाजता खाजगी वाहनाने जालना येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हा तक्रार निवारण अधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या समवेत एईपीडीएस अंतर्गम नियतन, उचल व वाटपाचा आढावा घेतील. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात‍ शिक्षणाधिकारी प्राथमिक व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत माहे एप्रिल 2022 ते मे 2023 पर्यंत नियतन, उचल वाटपाचा आढावा घेतील. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्य कार्यकारी अधिकारी व प्रकल्प अधिकारी शहर व ग्रामीण यांच्या समवेत महिला व बालविकास योजनेअंतर्गत कच्चे धान्य व ईएनडीएफ माहे एप्रिल 2022 ते मे 2023 पर्यंत नियतन उचल वाटपाचा आढावा घेतील. दुपारी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या समवेत जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांवर चर्चा करतील. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे मुक्काम करतील. मंगळवार दि.20 जुन 2023 रोजी सकाळी 10 ते 5.30 या वेळेत शासकीय धान्य गोदामे, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी देतील. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे मुक्काम करतील. बुधवार दि.21 जुन 2023 रोजी सकाळी 10.30 ते 1.30 या वेळेत शासकीय धान्य गोदामे, शालेय पोषण आहार पुरवठादार गोदामे, महिला व बाल विकास सेवा योजना पुरवठादार गोदामांना भेटी तसेच अंगणवाडी, स्वस्त धान्य दुकानांना भेटी आणि दुपारी 2 वाजता बीडकडे वाहनाने प्रयाण करतील. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment