Monday 19 June 2023

नागरिकांनी स्वस्त वाळु मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी

जालना, दि.19 (जिमाका) :- नागरिकांना स्वस्त दराने वाळु उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने दि.19 एप्रिल 2023 रोजी नवीन धोरण जाहीर केले आहे. जिल्ह्यात अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव वाळु डेपो येथे 7 हजार 8 बास व आपेगाव वाळु डेपो येथे 1 हजार 450 ब्रास वाळु उत्खनन करुन रेतीसाठा करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी स्वस्त दरात रेती मिळण्यासाठी mahakhanij.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यात स्वस्त दराने रेती उपलब्ध करुन देण्यासाठी 10 ठिकाणी रेती डेपो निश्चित करुन निविदा मागविण्यात आल्या होत्या.त्यानूसार अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव व आपेगाव या ठिकाणच्या रेती डेपोसाठी निविदा प्राप्त झाल्या आहेत.आपल्या गावातील लगतच्या सेतू अथवा महा-ई सेवा केंद्रात जावून रेतीची मागणी नोंदवावी. सेतू केंद्रामध्ये मागणी नोंदविण्यासाठी प्रती व्यक्ती 25 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मागणी नोंदविण्यासाठी संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड व मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे. एका कुटुंबास एकावेळी जास्तीत जास्त 50 मे.टन अंदाजे 11 ब्रास रेती अनुज्ञेय राहील. वाळुची मागणी नोदविल्यानंतर 15 दिवसाच्या आत वाळु डेपोमधून रेती घेवून जाणे ग्राहकावर बंधनकारक आहे. वाळु वाहतुक करणाऱ्या वाहनांना एआरएआई सर्टीफाईड एआयएस-140 मॉडेलचे जीपीएस बसवून ते वाहन महाखनीज प्रणालीला लिंक करणे आवश्यक आहे. वाहतुकीचे सर्वसाधारण दर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले आहे. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment