Friday 2 June 2023

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने योजनेच्या अर्जातील त्रुटी पुर्ततेचे आवाहन

 


 

 

जालना, दि.2 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णयानूसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे. सन २०२२-२३ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले होते. सदरील अर्जाची छाननी करून पात्र व त्रुटीची पुर्तता असणाऱ्या बचत गटांची यादी समाज कल्याण कार्यालयातील सुचना फलकावर डकविण्यात आलेल्या आहेत. तसेच बचतगटांनी अर्जासोबत दिलेल्या पत्यावर त्रुटी पुर्तता करण्याबाबत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. तरी ज्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या योजनेंतर्गत अर्ज केलेले आहेत अशा बचत गटांनी यादीमध्ये दर्शविल्याप्रमाणे त्रुटीची पूर्तता करण्यासाठी आवश्यक ते सर्व कागदपत्रे छायांकित प्रतीसह सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयात दि. 15 जुन 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त समाजकल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

No comments:

Post a Comment