Wednesday 14 June 2023

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेतील प्रवेशासाठी जिल्ह्यातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आवाहन

जालना, दि. 14 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांमार्फत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या जालना जिल्ह्यातील एकुण 13 शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील धनगर व त्याच्या उपजातीमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त दत्तात्रय वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. प्रवेश घेण्याकरीता प्रवेशित विद्यार्थी हा धनगर व त्यांच्या उपजाती मधील असावा व त्याबाबतचे जात प्रमाणपत्र असावे. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये इयत्ता पहिली ते पाचवी वर्गात प्रवेशित असावा. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतल्यास जन्माचा दाखला आणि पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत व आर्थिक वर्ष 2023-24 मधील असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील श्री.गणपती इंग्लिश स्कुल, जालना येथील ग्लोबल गुरुकुल इंग्लिश स्कुल, सिंहगड इंग्लिश स्कुल, स्वास्तिक इंग्लिश स्कुल, ध्रुवा इंग्लिश स्कुल, प्रतापगड इंग्लिश स्कुल आणि विद्यासागर इंग्लिश स्कुल, बदनापूर येथील आर.पी. इंग्लिश स्कुल व आर.पी.इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल, जामखेड येथील आदर्श इंग्लिश स्कुल, वडीगोद्री येथील संत सावता इंग्लिश स्कुल, सेलगांव येथील जिजाऊ इंग्लिश स्कुल, रेवगाव येथील किंग शिवाजी इंटरनॅशनल इंग्लिश स्कुल या शाळेची निवड करण्यात आली आहे. शासनाने वेळोवेळी घोषीत केलेल्या धनगर व त्यांच्या उपजाती या मधील विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व सोयी-सुविधा मोफत उपलब्ध असून सदर शाळेत या योजनेंतर्गत अर्ज तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश घेण्याकरीता मान्यता मिळालेल्या सर्व शाळेतील मुख्याध्यापकांना भेट देऊन अर्ज सादर करावेत तसेच सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयाकडे किंवा कार्यालयाच्या अधिनस्त शासकीय निवासी शाळा बदनापुर, शासकीय निवासी शाळा भोकदरन, शासकीय निवासी शाळा जालना येथे भेट देऊन अर्ज उपलब्ध करुन घ्यावेत. अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण जालना कार्यालयांतील दुरध्वनी क्र.02482-225172 यावर संपर्क करावा. असे सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment