Friday 9 June 2023
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा
जालना, दि.9 (जिमाका) :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथे आयटीआय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांसाठी सोमवार दि. 12 जुन 2023 रोजी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी शिकाऊ भरती मेळाव्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचे अंशकालिन प्राचार्य प्रविणकुमार उखळीकर यांनी केले आहे
भरती मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. भरती मेळाव्यात सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, मार्कशिट आधारकार्ड, पॅनकार्डची छायांकित प्रत व पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत बाळगणे अनिवार्य राहिल. जिल्ह्यातील उमेदवारांनी सोमवार दि. 12 जुन 2023 रोजी सकाळी 10 वाजता जालना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कार्यशाळा क्र.2 मध्ये उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी कनिष्ठ प्रशिक्षण सल्लागार ए.एस. धाबे (मो.9922531766) यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment