Monday 5 June 2023

12 जून जागतिक बाल कामगार विरोधी दिन बालकामगारांना कामावर ठेवणे गुन्हा

 

   जालना दि. 5 (जिमाका) :- 12 जून हा जागतिक बाल कामगार विरोधी दिन म्हणुन पाळण्यात येतो. त्याचे औचित्य साधुन कामगार विभागाकडुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. बाल कामगारांच्या त्यांचे बाल वयात कामावर ठेवल्यामुळे त्यांच्या मुलभुत हक्कांवर गदा येऊन त्याचे बालपन हिरावले जाते त्यामुळे त्यांचा शारीरीक व मानसिक विकास होत नाही परिणामत: बाल कामगारांचे वैयक्तिक, त्यांचे कुटुंबीयांचे नुकसान होऊन देशाच्या विकासात अडथळा येऊ शकतो. बाल कामगारांना त्यांचे बाल वयात काम करावे लागत असल्याने त्यांचे दुर्लक्ष होऊन ते शिक्षणापासुन वंचीत रहातात, बाल वयात कामाच्या ठिकाणी बालकांचे शोषण करण्यात येते, त्यामुळे त्यांच्या बाल मनावर विपरीत परिणाम  होत असतो.

        जालना जिल्ह्यातील सर्व कारखानदार, दुकाने, आस्थापना, हॉटेल, व इतर संस्था यांना कळविण्यात येते की, त्यांनी त्यांचेकडे 14 ते 18 वर्षाखालील बाल कामगार कामावर ठेऊ नये, बाल कामगार कामावर ठेवल्यास बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारीत अधिनियम 2016 नुसार मालकास 6 महिने ते दोन वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान 20 हजार रुपये व कमाल 50 हजार रुपये पर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा मालकास होऊ शकतात. तरी सर्व संबंधीतांनी त्यांचे आस्थापनेत बाल कामगार कामावर ठेऊ नये अन्यथा बालकामगार कामावर ठेवल्यास आपल्या विरुध्द बाल कामगार कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ. मा. जाधव  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

          -*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment