Tuesday 20 June 2023

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी 6.30 वा. सामुहिक योगाचे आयोजन

जालना, दि. 20 (जिमाका) :- दि. 21 जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणुन दरवर्षी साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलावर बुधवार, दि. 21 जून रोजी सकाळी 6.30 वाजता सामुहिक योगा शिबीर व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सामुहिक योगा व प्रात्यक्षिकासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी कर्मचारी, खेळाडू, क्रीडा संघटक, क्रीडा प्रेमी, युवक- युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे. जिल्ह्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन, जिल्हास्तरीय योग समिती, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जालना, क्रीडा भारती, जिल्हा योग संघटना जालना, सार्वजनिक आरोग्य़ विभाग, जिल्हा युवा अधिकारी, नेहरू युवा केंद्र, विविध योग संघटना, जिल्हा स्काऊट गाईड, तंत्र निकेतन महाविद्यालय व जिल्हा एकविध क्रीडा संघटना, विविध क्रीडा मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जुन 2023 रोजी सकाळी 6.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे सामुहिक योगा व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. या योग प्रात्यक्षिकात सहभागींचा पांढरा ड्रेस असावा, सोबत मॅट/सतरंजी, पाणी बॉटल व नॅपकीन सोबत बाळगावे. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक महमंद शेख मो. 8788360313, संतोष वाबळे मो.7588169493, रेखा परदेशी, मो.9022951924 यांच्याशी संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

No comments:

Post a Comment