Friday 2 June 2023

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आकाशवाणीवर "वनवार्ता" कार्यक्रम वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मनोगत होणार प्रसारीत

 


जालना, दि.2 (जिमाका) :-  वनाविषयी कुतूहल, गमतीजमती, रंजक गोष्टीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पर्यावरण विषयक चर्चा व महत्वाच्या बाबी, त्यावरील उपाय, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव पर्यटन, हरित सेना (इको क्लब) वृक्ष लागवडीसंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मनोगत आकाशवाणीच्या माध्यमातून "वनवार्ता" या कार्यक्रमातून प्रसारित करण्यात येणार आहे. सोमवार, दि. ५ जुन २०२३ रोजी सकाळी ८.४० वाजता जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी "वनवार्ता" या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. याद्वारे श्री. मुनगंटीवार मनोगत व्यक्त करणार आहेत.

हा कार्यक्रम पंधरा मिनिटांचा  आहे, असे मुख्यलेखापाल, सामाजिक वनीकरण,जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

                                                             -*-*-*-*-

No comments:

Post a Comment