Monday 5 June 2023

मिशन लाईफ अतंर्गत मिलेट मेला संपन्न निरोगी व सुदृढतेसाठी आहारात तृणधान्याचा वापर करावा ------ जिल्हा शल्य चिकित्सक



  जालना दि. 5 (जिमाका) :- आजच्या आधुनिक काळात मानवाचे जीवन खुप धावपळीचे झाले आहे.यामुळे स्वत: च्या शरीरावर याचे दुष्परिणाम होत आहे.आपले शरीर निरोगी व सदृढ राहावे यासाठी दररोज च्या आहारात सर्व तृणधान्याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा  शल्यचिकित्सक डॉ.प्रताप घोडके यांनी  केले.नेहरू युवा केंद्र,जालना यांच्या वतीने आतंरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्ताने  मिशन लाईफ अतंर्गत मिलेट मेला या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा सामान्य रुग्णालय,येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर,नर्सिंग महाविद्यालयच्या प्रार्चाया डॉ.लोडते,नशाबंदीचे बी.एस.सय्यद,तेजस जनविकासचे शिवाजी तायडे ,संदीप गोरे (राष्ट्रीय तंबाखू   कार्यक्रम) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी निसर्ग व पर्यावरण या विषयावर माहीती देण्यात आली.मिलेट मेला मध्ये विविध तृणधान्याचे प्रदर्शन व त्याची शास्त्रीय माहिती देऊन मोठ्या प्रमाणात तृणधान्य वापरण्यासाठी जनजागृती करण्यात आली.यावेळी नेहरु युवा केंद्राचे प्रणीत सांगवीकर यांनी सर्व  मिलेट वापरण्याची शपथ दिली.या कार्यक्रममध्ये नागरिक,नर्सिंग चे विद्यार्थी ,युवक व महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुञसंचलन बी.एस.सय्यद यांनी केले व  आभार युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष जयपाल राठोड यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिती झिने आणि श्वेता इंगळे यानी सहकार्य केले.

                                              -*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment