Thursday 8 June 2023

जिल्हा परिषद आरोग्य विभागास आयसीआयसीआय फाउंडेशनतर्फे आरोग्य साहित्यांचे हस्तांतरण

 




      जालना, दि. 7 (जिमाका) -- गरोदर मातांचे रक्त तपासणीकरीता लागणारे एचबी मीटर व कुटूंब नियोजन बिनटाका शस्त्रक्रियाचे लेप्रोस्कोप मशिन आदी साहित्य जिल्हा परिषद, आरोग्य विभागास आयसीआयसीआय बँकेअर्तंगत सामाजिक  कार्य करणाऱ्या  आयसीआयसीआय फाउंडेशनने हस्तांतरीत केले, असे आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेने प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. हा हस्तांतरणाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात  दि. 6 जून रोजी पार पडला.

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास झोनल हेड आयसीआयसीआय फाउंडेशन, मुंबईच्या मोनिका आचार्य, झोनल हेड आयसीआयसीआय बॅंकेचे विलास धुरंधर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. परशुराम नागदरवाड यांची उपस्थिती घेण्यात आला.

जिल्हाधिकारी यांनी आयसीआयसीआय फाउंडेशनमार्फत जिल्हयात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहीती घेवून कामाचे कौतुक केले व वृक्षारोपणासाठी व कॅंसरग्रस्तांसाठी आयसीआयसीआय फाउंडेशनने सहकार्य करावे, असे  सूचित केले. प्रकल्प व्यवस्थापक दिपक पाटील यांनी आयसीआयसीआय फाउंडेशनमार्फत जिल्हयात विविध ठिकाणी सुरु असलेल्या कामाची माहीती दिली. डॉ. परशुराम नागदरवाड यांनी दिलेल्या साहीत्याबाबत आभार मानले. अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी

कार्यक्रमास जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन म्हस्के, प्रकल्प विकास अधिकारी आयसीआयसीआय फाउंडेशन  शेषराव ससाने, प्रशासकिय अधिकारी राधाकिशन कड, ब्रांच मॅनेजर आयसीआयसीआय बँक स्वप्नील पांडे, आयसीआयसीआय बँकचे सुदर्शन कालते, महेंद्र वर्मा, राजू रसाळ, दत्ता गजलबाड, विनोद राठोड उपस्थित होते. आरोग्य सहायक रविंद्र सोनार यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे व आयसीआयसीआय फाउंडेशनचे आभार मानले.-

                                                                              -*-*-*-*-

No comments:

Post a Comment