Tuesday 14 February 2023

पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्याचे धनगर समाजातील विद्यार्थ्यांना आवाहन

 


 

जालना, दि. 14 (जिमाका) :-   महाराष्ट्र शासन, इतर मागास व बहुजन कल्याण विभाग मुंबई आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीसाठी सुरु असलेल्या प्रस्तावास अनुलक्षुन आदिवासींच्या धर्तीवर धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या शैक्षणिक वर्षापासुन सुरु करण्यात आली आहे.

            सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी धनगर समाजातील जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी पात्र असुनही ज्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांकरिता महानगरपालिका, विभागीय शहरे, आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षांपासुन इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण तसेच व्यवसायीक शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय व अनुदानित महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयाव्दारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना या योजनेअंतर्गत भोजन ,निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅंक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यास मान्यता दिली आहे.

            सदर योजना महानगर पालिका ,विभागीय शहरे आणि जिल्हास्तरावरील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त  तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या शासकीय तसेच अनुदानित महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेव्दारे प्रवेश घेऊन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना लागु राहील.

            या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी धनगर समाजाचा असावा ,जातीचे प्रमाणपत्र,पालकांचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे, आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा,ज्या शहरात विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेला आहे त्या शहरातील नसावा.12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेणारा असावा,12 वीत किमान 60 टक्के गुण असावेत, दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.महाविद्यालयीन उपस्थिती 60 टक्के असावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी आवेदन पत्र सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातून घेवून सदर नमुन्यामध्ये दिनांक 28 फेब्रूवारी 2023 पर्यंत सहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण जालना कार्यालयात सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment