Wednesday 8 February 2023

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विविध क्रीडा स्पर्धां आयोजित

 


 

जालना दि. 8 (जिमाका) :- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने दि.17 सप्टेंबर 2022 ते दि.16 सप्टेंबर 2023 या कालावधीत विविध उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी सुचना दिलेल्या आहेत. तरी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात असून या स्पर्धेत खेळाडू, क्रीडा संघटना, नागरिक, महिला, अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

स्पर्धेमध्ये कबड्डी स्पर्धा दि.6 फेब्रुवारी 2023 रोजी जालना येथील जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनी, खो-खो दि.7 फेब्रुवारी 2023 रोजी बदनापूर तालुक्यातील कै.नानासाहेब पाटील विद्यालय नजिक पांगरी, रोलर स्केंटीग स्पर्धा दि.8 फेब्रुवारी 2023 रोजी जालना येथील कामगार कल्याण भवनात, फुटबॉल क्रीडा स्पर्धा दि.9 फेब्रुवारी 2023 रोजी तर तायक्वांदो स्पर्धा दि.6 फेब्रुवारी 2023 रोजी जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडणार आहेत. असेही जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment