Wednesday 8 February 2023

13 फेब्रुवारीला रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन; नोंदणीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत संपर्क साधावा

 


 

जालना दि. 8 (जिमाका) :- जिल्ह्यात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान राबविण्यात येत असून दि.30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कुष्ठरोग निवारण दिन व पंधरवाड्यात विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येत असून याअंतर्गत रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन कार्यक्रमाचे आयोजन जालना शहरात दि.13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 वाजता  करण्यात आले आहे. रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागासाठी शारिरीक सक्षम असल्याबाबतच्या प्रमाणपत्रासह जिल्हा  रुग्णालय परिसरातील सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) कार्यालयात नाव नोंदणीसाठी दि.10 फेब्रुवारी 2023 पर्यंत संपर्क साधावा. रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेत माध्यमिक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, स्वयंसेवी संस्था, आयएमए, संघटना, पुरस्कार प्राप्त क्षेत्रातील खेळाडू यांनी सहभाग नोंदवावा. मॅरेथॉन जिल्हा सामान्य रुग्णालयापासून सुरु होवून सामाजिक न्याय भवन ते जिल्हा परिषदेसमोरुन अंबड चौफुलीमार्गे सतकर कॉम्प्लेक्स येथून जिल्हा सामान्य रुग्णालयात येवून समारोप होईल. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments:

Post a Comment