Wednesday 8 February 2023

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारसाठी अर्ज सादर करण्यासासाठी 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ


 

जालना दि. 8 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. राज्य क्रीडा पुरस्काराचे अर्ज करण्यासाठी दि. 16 ते 30 जानेवारी 2023 हा कालावधी देण्यात आला होता. तरी आता पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास दि. 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.  https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील सर्व माहिती व फॉर्म घेऊन परिपुर्ण अर्ज भरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा पुरस्कार, जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येत असतात. शासनाने दि. 14 डिसेंबर 2022 च्या शासन निर्णयान्वये शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी नियमावली विहित केली आहे. या नियमावलीनुसार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन स्वतंत्र वर्षांच्या पुरस्कारासाठी राज्यातील जेष्ठ क्रीडा पट्टू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू यांच्यामार्फत अर्ज मागविण्यात आले आहेत. असेही जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-


No comments:

Post a Comment