Thursday 9 February 2023

बदनापूर येथे 17 फेब्रुवारीला विभागीय रोजगार मेळावा

 


जालना दि. 9 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्यामार्फत बदनापूर येथील रावसाहेब पाटील दानवे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दि. 17 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 9.30 ते 4 वाजेपर्यंत पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा जास्तीत जास्त भरती इच्छुक नियुक्ती प्राधिकारी आणि नोकरी इच्छूक उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे.

रोजगार मेळाव्यासाठी सद्यस्थितीत 208 रिक्त पदे उपलब्ध झाली असून आणखी काही पदे उपलब्ध होत आहेत. यासाठी नोकरी इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उपलब्ध संधीचा लाभ घ्यावा. रोजगार कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी उपस्थित राहुन व प्रत्यक्ष मुलाखती घेवून उमेदवारांची निवड करणार आहे. तरी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा. तसेच उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व पासपोर्ट फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड आदी कंपनीला देण्यासाठी सोबत ठेवावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा यापुर्वी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील रिक्तपदे व पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणाऱ्या पदांसाठी ऑनलाईन अॅप्लाय करुन लॉग ईन करावे आणि प्रत्यक्ष मुलाखतीसाठी रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे.   रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर आपल्या लॉग-ईनद्वारे DIVISIONAL JOB FAIR 2-JALNA यामध्ये भरण्यात यावी. याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२४८२- २९९०३३ या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क करावा.  असे सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment