Monday 13 February 2023

कुष्ठरोग निवारण दिन व जनजागृती पंधरवडा अंतर्गत रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

 


 

जालना, दि. 13 (जिमाका) :- जिल्ह्यात कुष्ठरोग निवारण दिन व जनजागृती पंधरवाडा दि. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत साजरा करण्यात येत असून या अंतर्गत रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धा सोमवार दि. 13 फेब्रुवारी 2023 रोजी संपन्न झाली. या स्पर्धेचा शुभारंभ आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. श्यामकांत गावंडे यांच्या हस्ते रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेस हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आला.

रन फॉर लेप्रसी मॅरेथॉन स्पर्धेला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून सुरुवात होवून सामाजिक न्यास भवन, जालना जिल्हा परिषद, अंबड चौफुली ते सतकर कॉम्‍प्लेक्स मार्गे जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे पोहोचून समारोप करण्यात आला. सहभागी स्पर्धकांमधुन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची निवड करण्यात आली त्यांना रोख रक्कम अनुक्रमे रु.४०००/-, २५००/- व १५००/- व प्रशस्तीपत्र जिल्हा परिषदेचे अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मस्के व कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. श्यामकांत गावंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. जिल्हाधिकारी तसेच  मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद, जालना यांच्या सुचनेनुसार व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अर्चना भोसले, व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांच्या  मार्गदर्शनाखाली कुष्ठरोगविषयक संदेश जनसामांन्यांपर्यत पोहोचवण्यासाठी जिल्हास्तरीय खुली "रन फॉर लेप्रसी मॅरेथॉनचे स्पर्धेचे आयोजन दि. 13 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा ( कुष्ठरोग) कार्यालयातील अधिकारी- कर्मचाऱ्यासह जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment