Friday 17 February 2023

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील 20 फेब्रुवारी जालना जिल्हा दौऱ्यावर पाणी पुरवठा योजनांचे ई-भूमिपूजन

 


जालना, दि. 17 (जिमाका) :-  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे जालना  20 फेब्रुवारी रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10.15 वाजता औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने जालनाकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता जालना येथे आगमन व जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांचे ई-भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-पोलिस क्रीडा मैदान, सेशन कोर्टच्या बाजूला, जालना), दुपारी 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह जालनाकडे प्रयाण आगमन व राखीव, दुपारी 2 वाजता जालना येथून शासकीय वाहनाने सुभेदारी शासकीय विश्रामगृह औरंगाबादकडे ते प्रयाण करतील.

-*-*-*-*-

 

No comments:

Post a Comment