Tuesday 7 February 2023

राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान जालना येथे स्पर्धेचे आयोजन


 


 

जालना दि. 7 (जिमाका) :- राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धांचे जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलात दि.13 ते 15 फेब्रुवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी  जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित बैठकीत घेतला.

जिल्हाधिकारी श्री. राठोड यांनी बैठकीत राज्यस्तरीय स्पर्धा अतिशय चोख व नियोजनबध्दपणे पार पाडण्यात याव्यात तसेच कुठल्याही प्रकारे खेळाडुंची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.  राज्यस्तरीय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धा सुरळीतपणे व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी  विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. स्पर्धेत राज्यात विभागीय स्तरावर निवड केलेले खेळाडू मुले-128 व मुली-128 व संघ व्यवस्थापक-12, पंच-12 सहभागी होणार आहेत. जालना येथे स्पर्धा कालावधीत या सर्वांची निवास व  भोजनाची सोय करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी दिली. या बैठकीस जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे श्री. इंगोले, क्रीडा अधिकारी रेखा परदेशी, क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे,  यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

 

 

No comments:

Post a Comment