Tuesday 14 February 2023

थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाचा पाणी पुरवठासह विद्युत पुरवठा होणार खंडीत

 


जालना, दि. 14 (जिमाका) :-   जालना पाटबंधारे विभाग, जालना अधिनस्त पाटबंधारे उप विभाग क्र.1 जालना उप विभाग क्र.2 अंबड उप विभाग क्र.3 टेंभुर्णी  व उप विभाग क्र. 4 वाटुर या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील प्रकल्प निहाय बिगर सिंचन ग्रामपंचायत पिण्याच्या पाण्याच्या योजना कार्यान्वित आहेत. सदर योजनेकडे बिगर सिंचन पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.

सदर थकबाकी वसुलीसाठी अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण यांच्या आदेशानुसार दि. 30 जानेवारी 2023 रोजी धडक मोहिम राबवून सर्व उप-विभागाकडुन जिल्ह्यात एकाच वेळी प्रकल्पातुन पिण्यासाठी पाणी उपसा करणाऱ्या योजनेचे पाणी पुरवठा सह विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता, त्यामुळे काही प्रमाणात वसुली झाली परंतु प्राधिकरण कार्यालयाकडून 100 टक्के थकीत पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट असल्याने प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातुन बिगर सिंचन पिण्याच्या पाण्याचा उपसा करणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाचा पाणी पुरवठासह विद्युत पुरवठा दि. 15 फेब्रुवारी 2023 पासून खंडीत करण्यात येणार आहे. अशी माहिती जालना पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. कोरके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment