Thursday 9 February 2023

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षेसाठी अर्ज करण्यास 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

 

जालना दि. 9 (जिमाका) :-  जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दि. 29 एप्रिल 2023  साठी ऑनलाईन अर्ज पद्धतीने भरण्यात येत असून जालना जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व इयत्ता पाचवी वर्गात सन 2022-23 मध्ये शिकत असणाऱ्या  विद्यार्थ्यांनी नोंदणी सेवाकेंद्रावरून व इतर यंत्रणेचा वापर करून ऑनलाईन अर्ज करण्यास आता बुधवार दि.15 फेब्रुवारी 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तरी जिल्हाभरातील मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज सादर करावेत, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य शैलेश नागदेवते यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी  अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 फेब्रुवारी 2023 अशी देण्यात आली होती. तरी आता प्रशासकीय कारणास्तव ही मुदत वाढवून 15 फेब्रुवारी 2023 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. ऑनलाईन दुरुस्ती पोर्टल ही दि.16 व 17 फेब्रुवारी 2023 रोजी चालू राहील तरी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या लिंग, प्रवर्ग, क्षेत्र,  दिव्यांगत्व व माध्यम यामध्ये दुरूस्ती करावयाची असेल त्यांनी याच दरम्यान करावी. तरी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2023 साठी इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी पाचवीच्या मुख्याध्यापकांकडुन प्रमाणपत्र भरून घ्यावेत व त्यावर विद्यार्थ्याचा फोटो, स्वाक्षरी व पालकांची स्वाक्षरी करुन सदर प्रमाणपत्र हे मुख्याध्यापाकाद्वारे प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची जाहिरात, माहितीपत्रक, सुधारीत प्रमाणपत्र आदी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. फॉर्म भरण्यासाठीचे प्रमाणपत्रे, फोटो, स्वाक्षऱ्या आदी 10 ते 100 केबीमध्ये स्कॅन करून "www.navodaya.gov.in", या संकेतस्थळावर भरावेत.  प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा जन्म हा दि. 1 मे 2011 ते 30 एप्रिल 2013 च्या दरम्यानचा असावा. असे प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, अंबा-परतूर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment