Wednesday 8 February 2023

मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजनेअंतर्गत कर्ज मंजुरी मेळावा संपन्न

 

 

जालना दि. 8 (जिमाका) :-  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम  हा उद्योग विभाग, महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशीप कार्यक्रम असुन राज्यातील युवक, युवतीना उद्योजक बनविण्यासाठी सक्षम करणारी आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देणारी योजना आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनूसार योजनेअंतर्गत बँकांना शिफारस करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांना मंजुरी देण्याबाबत कर्ज मंजुरी मेळावा जिल्ह्यातील बँक शाखाधिकांऱ्यांच्या समवेत मंगळवार दि.7 फेब्रुवारी 2023 रोजी सामाजिक न्याय भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यबल समिती अध्यक्ष  डॉ.विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.  

 मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम योजनेअंतर्गत कर्ज मंजुरी मेळाव्यास जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक श्रीमती के.व्ही. खरात,  जिल्हा अग्रणी बँक अधिकारी प्रेषित मोघे, जिल्ह्यातील सर्व बँकांचे शाखाधिकारी व योजनेअंतर्गत लाभार्थी उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी या मेळाव्यात उपस्थितांना मार्गदर्शन केले व मेळाव्याअंतर्गत बँक ऑफ बडोदा (04), स्टेट बँक ऑफ इंडिया (02), पंजाब नॅशलन बँक (01) असे एकूण 07 कर्ज प्रकरणे बँकांनी प्रत्यक्षात कर्ज मंजुर केली आहेत. त्या सर्व बँक शाखाधिका-यांचे  अभिनंदन करुन  लाभार्थ्यांना मिळालेल्या कर्जाचा त्यांनी योग्य तो वापर करुन त्यांचा उद्योग चांगल्या प्रकारे करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच उपस्थित बँक अधिकाऱ्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट सर्व बँकांनी माहे मार्च 2023 अखेर 100 टक्के पुर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी लाभार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणीबाबत संबंधीत बँकांचे शाखाधिकारी यांनी कर्ज प्रकरणे मंजुरी करण्याच्यादृष्टीने लाभार्थ्यांना प्रत्यक्षात लाभार्थीनिहाय योग्य ते मार्गदर्शन केले. सदर कर्ज मंजुरी मेळाव्यात बीआएम- ४. एसबीआय ३५, एमजीबी-६, बीओबी-३, कॅनरा बँक-२, पीएनबी-३, युबीआय- ४, आयडीबीआय-३, बीओआय-३, आयओबी-२ असे जवळपास ६५ कर्ज प्रकरणांना तत्वतः  मंजुरी दिली आहे. राज्यातील ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षीत युवक-युवतीची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रातील राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकतेला चालना देण्यासाठी, गावातील प्रत्येक युवक-युवतींच्या हाताला काम देण्यासाठी सन 2022-23 या वर्षामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना जिल्हा उद्योग केंद्र, जालना कार्यालयामार्फत  जिल्हाधिकारी, जालना यांचे मार्गदर्शनांतर्गत राबविण्यात येत आहे. असे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment