Wednesday 8 February 2023

जिल्हास्तरीय एफ सी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धां 15 फेब्रुवारीपासुन सुरु

 


 

जालना दि. 8 (जिमाका) :- महाराष्ट्र राज्य तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांचे करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या एफ सी बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी  जिल्ह्यातील 14 वर्षाच्याआतील मुलांच्या संघासाठी शाळा, फुटबॉल संघटना, क्लब यांनी आपले संघाची प्रवेशिका सोमवार दि. 13 फेब्रुवारी 2023 दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना येथे प्रत्यक्ष जमा करण्यात याव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांचेशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झाला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबध्द प्रशिक्षण, पायाभुत सुविधा यांना चालना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांचे करारामध्ये क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या एफ सी बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, जालना यांच्या वतीने जिल्हास्तर एफ सी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा दि. 16 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या आहे. मुदतीनंतर आलेल्या संघ प्रवेशिकाचा विचार केला जाणार नाही.  अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक महमंद शेख मो.8788360313 यांच्याशी संपर्क साधावा. जिल्हा क्रीडा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
   

                                                                  -*-*-*-*-

No comments:

Post a Comment