Friday 3 February 2023

राष्ट्रीय लोकअदालतचे 11 फेब्रुवारीला आयोजन; लोकअदालतीमध्ये प्रकरणे तडजोडीने मिटविण्याचे आवाहन

 


जालना दि. 3 (जिमाका) :- जिल्हा व सत्र न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयामध्ये विविध प्रकरणे तडजोडीने सोडविण्यासाठी शनिवार, दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व संबंधित पक्षकारांनी या संधीचा फायदा घेवून आपली जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवून तडजोडीने मिटवुन पैसा, वेळ व श्रमाची बचत करावी, असे आवाहन जालना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे  सचिव श्रीमती पी. पी. भारसाकडे-वाघ यांनी केले आहे.

 जिल्हा व सत्र न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयामध्ये दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कलम 138 निगोशिएबल इन्स्टुमेंट अॅक्टची प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, औद्योगिक कामगार व सहकार न्यायालयातील प्रकरणे, विद्युत प्रकरणे तसेच बॅक, पतसंस्था, वित्तीय संस्था यांची वसूली प्रकरणे, ग्रामपंचायती व नगर परिषद यांच्याकडील पाणी बिल, महसुलची प्रकरणे, बीएसएनएलची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे व ईतर प्रलंबित व दावा दाखलपूर्व प्रकरणे इत्यादी प्रकरणासाठी राष्ट्रीय लोक अदालतचे शनिवार, दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment