Tuesday 22 September 2020

शेतपीकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा -- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश

          जालना, दि. 22 – जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन या नुकसानीचे पंचनामे तातडीने करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले आहेत.

             जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पावसामुळे शेतपीकांचे मोठे नुकसान झाले असुन रिलायंस जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती बाधित क्षेत्रामध्ये वैयक्तिक पंचनामे करण्यासाठी शासकीय पोर्टल,बँक, कृषि, महसुल विभागाद्वारे माहिती प्राप्त करुन घेऊन ४८ तासांमध्ये नुकसानीचे मुल्यांकन निश्चित करण्यासाठी विहित अनुभव व शैक्षणिक पात्रतेच्या निकषानुसार पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी. विमा कंपनीचा पर्यवेक्षक, तालुकास्तरावरील कृषि अधिकारी आणि संबंधित शेतकऱ्याचा समावेश असलेल्या संयुक्त समितीमार्फत पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात यावे. बाधित क्षेत्र हे अधिसुचित विमा क्षेत्राच्या 25 टक्क्यापर्यंत असेल तर वैयक्तिक स्तरावर व 25 टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अधिसुचित क्षेत्रातील पात्र शेतकरी जे विमा योजनेत सहभागी असतील व पीकांचे नुकसान विहित वेळेत पूर्वसुचना दिलेले नुकसान भरपाईस पात्र ठरतील. येत्या १० दिवसांच्या आत नुकसानीचा अहवाल तयार करुन शासन निर्देशानुसार कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी एका आदेशाद्वारे दिल्या आहेत.

*******

No comments:

Post a Comment